
कोल्हापूर : दुचाकी चोरून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या राहुल बंडोपंत मोरे (वय ३४, रा. रांगोळी, ता. हातकणंगले) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. व्ही. टी. पाटील सभागृहापासून दुचाकी चोरल्यानंतर तो थेट कर्नाटककडे पसार झाला होता. पोलिसांनी या मार्गावरील १३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्याचा माग काढून शोध घेतला. संशयिताकडून चोरीचे आणखीन तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.