मुरगूड : कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे (Birdev Donne) हा युवक मोठ्या जिद्दीने आयपीएस झाला. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील माळरानावर मेंढरे चारत होता. दुर्दैवाने निकालादिवशीच बिरदेवचा फोन चोरीला गेला होता. पण, आई-वडील आणि भावाला त्याने फोन हरवला, असे न सांगता फोन बंद झाल्याचे सांगितले.