

BJP leaders during a strategy meeting on Kolhapur Zilla Parishad seat distribution.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहात भाजप, आवाडे आणि महाडिक गट मिळून १९ जागा होत्या. मात्र, आता जिल्ह्यात भाजपचे दोन व एक सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी जिल्ह्यातील ४० जागांवर आपला दावा सांगितला आहे.