

BJP Candidate List to Be Finalised in Mumbai
sakal
इचलकरंजी : शहरातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या यादीवर गुरुवारी (ता. २५) मुंबईत शिक्कामोर्तब होणार आहे. १६ पैकी १४ प्रभागांतील जवळपास सर्व जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत, तर दोन उमेदवारांच्या नावांबाबत मतभेद निर्माण झाल्यामुळे दोन प्रभागांतील उमेदवार निवडी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.