BJP Internal Conflict Intensifies : ६५ जागांसाठी ४२७ अर्ज; भाजपमध्ये नवे विरुद्ध जुने असा उघड संघर्ष, उमेदवारी वाटपावरून नाराजी वाढली; बंडखोरी रोखणे नेतृत्वासाठी मोठे आव्हान. एकतर्फी वाटणारी निवडणूक पक्षांतर्गत अस्वस्थतेमुळे चुरशीची होण्याची शक्यता
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणूक केवळ पक्षांमधील राजकीय लढत न राहता ती पक्षांतर्गत संघर्ष बनत आहे. सध्या एकतर्फी वाटणारी ही निवडणूक भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेमुळे चुरशीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.