
Marathi language is compulsory : ‘राज्यात केवळ मराठी भाषा सक्तीची आहे. हिंदी ही अन्य भाषांबरोबर पर्याय म्हणून उपलब्ध आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यवाहीची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झाली. यावरून खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांना कितीही पडद्याआड करण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही’, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मंत्री शेलार कोल्हापूर दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला भेट दिली. त्याच ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.