भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतली सुप्रिया सुळे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

bjp leader dhananjay mahadik meet to supriya sule
bjp leader dhananjay mahadik meet to supriya sule
Updated on

कोल्हापूर : भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनीच या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या भेटीने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.


धनंजय महाडिक यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढविली परंतु, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभेपूर्वी ते भाजपमध्ये दाखलो झाले होते. विधावसभेपूर्वी अनेकांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा रस्ता धरला होता. परंतु, निकालानंतर सत्तासमिकरणे बदलली आणि राष्ट्रवादी, काॅग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली. सत्तेचे पारडे फिरल्यानंतर पुन्हा काहीजण स्वगृही परतलेले पाहायला मिळाले. 

दरम्यान, साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चर्चा होती. आताही याच मुद्द्यावरून धनंजय महाडिक यांनी राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत आहे. परंतु, 'ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती,' असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही नेत्यांनो सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या इतर नेत्यांसह धनजंय महाडिक देखील उपस्थित होते. साखर उद्योगासाठीच फडणवीस यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आताहा महाडिक यांनी याच कामासाठी सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती,' असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com