"देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जनतेची बाजू ठामपणे मांडली; पण आता विरोधी पक्षाकडे असा कोणीही नेता नाही. जयंत पाटील हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत."
कोल्हापूर : ‘जयंत पाटील (Jayant Patil) हे वडिलांच्या रिक्त जागी राजकारणात आले. त्यांना संघर्ष म्हणजे काय, हे माहिती नाही. इस्लामपूर हा मतदारसंघ सोडला, तर महाराष्ट्रात त्यांची काही ताकद नाही. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यामुळे ते आता शरण आले आहेत,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.