''विधानसभेला शिवसेनेत जा'', हा फडणवीसांचा सल्ला मानला नाही, याचे फळ देशमुखांना आज मिळाले

bjp Pune Graduate candidate sangramsinh deshmukh avoids suggestion fadnavis joins shiv sena last year
bjp Pune Graduate candidate sangramsinh deshmukh avoids suggestion fadnavis joins shiv sena last year
Updated on

सांगली- सबर का फल मीठा होता है असे सहज म्हटले जाते. परंतु, राजकारणात कोणी सबर (प्रतिक्षा) करण्यास सहसा तयार नसतो. प्रत्येकजण संधी शोधत असतो. संधी मिळाली  की त्याचं सोनं करण्याच्या तयारीत अनेक जण असतात. परंतु, सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील आणि सध्या पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख याला अपवाद आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी लढविण्याचा सल्ला दिला होता परंतु, आपण भाजपसोबतच राहू अशी भूमिका देशमुख यांनी घेतली होती. त्यावेळी दाखविलेल्या प्रतिक्षेचे फळ त्यांना आता पुणे पदविधरच्या निमित्ताने मिळाले आहे. 

त्याचं झालं असं, देशमुख हे दिर्घकाळ राष्ट्रवीदीमध्ये होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीला त्यांनी पलूस- कडेगाव मतदार संघातून जोरदार तयारी केली होती. परंतु, एेनवेळी युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे जोरदार तयारी करूनही देशमुख यांना मैदानाबाहेर राहवे लागले होते. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांना शिवसेनेतून उमेदवारी घेणार का अशी, आॅफर दिली होती. परंतु, त्यावेळी देशमुख यांनी सेनेत न जाता थोडी प्रतिक्षा करू पण भाजपसोबतच राहू अशी भूमिका घेतली होती. देशमुख यांनी त्यावेळी प्रतिक्षा केल्यामुळेच आता त्यांनी पुणे पदवीधरचे गिफ्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. 

येत्या १ डिसेंबर रोजी होत असलेल्या पुणे पदवीधरचे देशमुख हे भाजपचे उमेदवार आहेत. सहा महिन्यापूर्वीच भाजपकडून त्यांना पदवीधरच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता त्यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाले आहे. अनेक दिग्जांची नावे चर्चेत असताना सर्वांना मागे टाकत देशमुख यांनी यावेळी बाजी मारली आहे. 

संग्रामसिंह देशमुख यांचा सांगली, सातारा आणि पुणे या तीन्ही जिल्ह्याशी थेट संपर्क आहे. त्यांना राजकीय वारसाही मोठा आहे. त्यांचे वडील दिवंगत संपतराव देशमुख हे १९९५ ला आमादार होते. त्यांनी काॅग्रेस नेते पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. परंतु, निडणुकीनंतर एका वर्षातच त्यांचे निधन झाले. वय लहान असल्यामुळे त्यावेळी वडिलांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर संग्रामसिंह यांना संधी मिळाली नाही. त्यांचे चुलतबंधू पृथ्वीराज देशमुख त्या पोटनिवडणुकीत आमदार झाले. त्यानंतर ११९९ ला राष्ट्रवीदीची स्थापना झाल्यानंतर देशमुख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. २०१४ ते राष्ट्रवादीतून भाजमध्ये आले.   

पुणे पदवीधर मतदार संघातून मला उमेदवारी देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी माझ्यासारख्या तरूण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. भाजपचा संपर्क आणि येथे झालेले काम यामुळे या निवडणुकीत आम्हीच बाजी मारू. चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर यांनी चांगले काम केलेल्या मतदार संघातून मला लढण्याची संधी मिळाली आहे. याचा आनंद आहे.
-संग्रामसिंह देशमुख

संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com