esakal | कोल्हापुरकरांनो तुम्ही समाजावर चांगुलपणाचा संस्कार केलात; चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

''कोल्हापुरकरांनो तुम्ही समाजावर चांगुलपणाचा संस्कार केलात''

''कोल्हापुरकरांनो तुम्ही समाजावर चांगुलपणाचा संस्कार केलात''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : समाजातील लोकांनी समाजाची काळजी घेणे हा चांगुलपणाचा संस्कार कोल्हापुरातील काही व्यक्ती आणि संस्थांनी कोरोनाकाळात आपल्यावर केला. म्हणून त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांचे कार्य अधिकाधिका लोकांपर्यंत पोहचावे. त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत. असे गौरोवोद्गार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी व्यक्त केले. ‘अभिमान कोल्हापुरचा‘ अभियानांतर्गत कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. गायन समाज देवलक्लब या ठिकाणी हा समारंभ झाला. (bjp-state-president-chandrakant-patil-covid-warriors-institution-awarded-kolhapur)

कोरोनाकाळात शहरातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी अन्नदान, धान्य वाटप, ओरोग्य सेवे सारखी कामे केली. काही जणांनी अंत्यसंस्काराचे महत्त्वाचे कार्य केले. कोविड सेंटर चालवली. अशा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भाजपतर्फे करण्यात आले होते. या सर्वांना कृतज्ञतापत्र, स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची माहिती देणारी ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तिवाक जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे यांनी केले. या प्रसंगी चंद्रकांच पाटील म्हणाले,‘देशाचा इतिहास पाहीला तर आपल्याला स्वयंपूर्ण समाज हे वैशिष्ट्य दिसून येते.

समाजातील प्रत्येक घटक एकमेकाला मदत करत आपले प्रश्न सोडवत होता. त्यामुळे त्याचे राजा, शासन यावर फारसे अवलंबून नव्हते. स्वातंत्र्यानंतर आपण जे मॉडेल स्विकारले यामध्ये प्रत्येक प्रश्न सरकारने सोडवावा अशी मानसिकता तयार झाली. कोरोनासारखे संकट पहिल्यांदाच आपल्यावर आले. मात्र या संकटात समाजातील या संस्था, व्यक्ती यांनी आपल्यावर चांगुलपणाचा संस्कार केला.स्वतःची आणि कुटंबाची काळजी घेत त्यांनी समाजातील गरजूंना सर्वोतोपरी मदत केली. समाजातील लोकांनी समाजाची काळजी घेतली. त्यांच्या अनमोल कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या व्यक्ती, संस्थांनी समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.‘ त्यानंतर जाफरबाबा, प्रिया दंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चारुदत्त जोशी यांनी केले. यावेळी प्रा.जयंत पाटील, सुहास लटोरे, भाजप नेते महेश जाधव, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

यांचा झाला सन्मान

मिलींद धोंड, जयेश ओसवाल, उमेश यादव, प्रिया दंडगे, शुभांगी थोरात,हर्षल सुर्वे, प्रिया पाटील (भवानी फौंडेशन), विराज सरनाईक (कर्तुत्व सामाजिक संस्था), अशोक देसाई (हिंदू युवा प्रतिष्ठान), अशोक रोकडे (व्हाईट आर्मी), ऐश्वर्या मुनिश्वर (सेवा निलायम), संताजी घोरपडे, डॉ.संगीता निंबाळकर, राजू मेवेकरी (महालक्ष्मी अन्नछत्र), अवधूत भाट्ये (द नेशन फस्ट), रवी जावळे (माणूसकी फौंडेशन), संभाजी उर्फ बंडा साळुंखे (सेवाव्रत प्रतिष्ठान), हिल रायडर्स (प्रमोद पाटील), जाफरबाबा (बैतुलमाल कमिटी), रॉबिनहूड आर्मी, पोलीस कर्मचारी भगवान गिरी गोसावी, निवास पाटील, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, चारुदत्त जोशी.

loading image