esakal | गृहमंत्र्यांविरोधात आणखी किती पुरावे हवेत? : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

BJP state president Chandrakant Patil criticism param bir singh political marathi news

ते म्हणाले,‘‘सचिन वाझे याच्या मागे सरकारमधील कोणी तरी बडी व्यक्ती आहे असे आम्ही सतत सांगत होतो. वाझे हा फक्त ‘कलेक्‍टर’ आहे.

गृहमंत्र्यांविरोधात आणखी किती पुरावे हवेत? : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली  : गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारचा भांडाफोड मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच केला आहे. हे सरकार भ्रष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आणखी किती पुरावे हवेत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केला.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,‘‘सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही आधीपासूनच करीत आहोत. त्याचे पुरावेही आम्ही दिले होते. तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. आता माजी पोलिस आयुक्तांनीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहून त्यांचा भांडाफोड केला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची 
मागणी आहे.’’

हेही वाचा- मुश्रीफ भडकले :  भाजपची सोची समझी चाल ; परमबीर सिंह यांची केंद्र सरकारशी हातमिळवणी


ते म्हणाले,‘‘सचिन वाझे याच्या मागे सरकारमधील कोणी तरी बडी व्यक्ती आहे असे आम्ही सतत सांगत होतो. वाझे हा फक्त ‘कलेक्‍टर’ आहे. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटके ठेवलेल्या गाडीच्या प्रकरणातून आणखी काय बाहेर येणार हे सांगता येत नाही. पण सरकारची राज्यात किती दहशत आहे, हे यावरून दिसून येते. गेल्या काही दिवसांत राज्यात जे मोठे गुन्हे घडले आहेत, त्यात एकापाठोपाठ एक मंत्री अडकत आहे. ’’

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top