इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ११ ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपसाठी आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करण्याची संधी मानली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हाळवणकर यांचा हा प्रभाग बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. .त्यामुळे प्रारंभी या निवडणुकीकडे एकतर्फी लढत म्हणून पाहिले जात होते; मात्र उमेदवारांची नावे जाहीर होताच अंतर्गत राजकारण उफाळून येत आहे. त्यामुळे सध्या या सोपी वाटणाऱ्या लढतीभोवती शंकाचे ढग निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. -संदीप जगताप.Ichalkarani Election : इच्छुकांची गर्दी आणि अनुभवी मातब्बरांची चुरस; प्रभाग सहामध्ये महायुतीसमोर उमेदवारीचा पेच.सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून हाळवणकर गटाचे तीन उमेदवार आणि आवाडे गटाचा एक उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. विरोधक असलेल्या शिवशाहू आघाडी किंवा अपक्षांमधून सध्या प्रबळ दावेदार दिसून येत नाही. .त्यामुळे वरवर पाहता भाजपसाठी ही निवडणूक सहज जिंकण्याजोगी वाटते; मात्र पक्षांतर्गत गटबाजीच या निवडणुकीचा निकाल बदलू शकते. हाळवणकर आणि आवाडे गटातील संघर्ष आणि भाजपकडून उमेदवारी नाकारलेले इच्छुक बंडखोरीच्या भूमिकेत गेले, तर भाजपसाठी ही लढत चांगलीच जड ठरू शकते..Ichalkaranji Election : औद्योगिक पट्टा, कामगार वस्ती आणि प्रदूषणाचे प्रश्न; प्रभाग १० ची निवडणूक चुरशीची होणार का?.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा व्यक्ती, स्थानिक समीकरणे आणि नाराजी अधिक प्रभावी ठरतात. हे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. हाळवणकर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. .रात्री नशेखोरांच्या भीतीने घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नशेत वाहन चालवणे, किरकोळ अपघात, दगडफेक यासारख्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. .या सर्व बाबींवर ठोस कारवाई होत नसल्याने काही प्रमाणात तरी नागरिकांमध्ये हाळवणकर गटाविषयी नाराजी दिसून येते. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्यास त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. विरोधक नसले तरी मतदारांचा रोष निर्णायक ठरू शकतो..प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक कागदावर भाजपसाठी सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष मैदानात ती तितकीच आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. अंतर्गत गटबाजी, संभाव्य बंडखोरी आणि वाढती नागरिकांची नाराजी हे घटक भाजपसाठी ही निवडणूक कठीण ठरू शकते. त्यामुळे बालेकिल्ला टिकवायचा असेल तर स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिकेवरच भाजपला भर द्यावा लागणार आहे..पुरुष मतदार = ७२९०महिला मतदा = ७०५३एकूण मतदार = १४३४३एकूण लोकसंख्या - १७५३२ अनुसूचित जाती लोकसंख्या = ५४०अनुसूचित जमाती लोकसंख्या = ३८६.आरक्षण असे...अ - ओबीसी ब - ओबीसी महिलाक - महिलाड - सर्वसाधारण.विकासाचे मुद्दे अनियमित पाणीपुरवठाड्रेनेज जोडण्याच्या प्रतीक्षेतस्वतंत्र पोलिस चौकी आवश्यकसारण गटारींची अस्वच्छतामूलभूत सुविधांचा अभाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.