आता पाच हजार रुपयात करा व्यवसाय ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॅप’ व ‘गिरिराजाचा’

Black Astrolabe and Giriraja birds Training at the egg hatchery kolhapur
Black Astrolabe and Giriraja birds Training at the egg hatchery kolhapur
Updated on

कोल्हापूर : वैभवची नोकरी गेली, त्याची पत्नी अल्पशिक्षित आहे, आई-वडील थकले आहेत. घर खर्च भागविण्याच्या चिंतेने अस्वस्थ केले आहे. अशात कोणी तरी कोल्हापूरच्या अंडी उबवणी केंद्रात जाण्यास सुचवले. वैभवने येथे दहा ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॅप’ व ‘गिरिराजा’ कोंबड्या, १०० अंडी खरेदी केली. अंड्यातून पिल्ले झाली, रोजची अंडी विकून कधी कोंबड्या विकून त्याची कमाई सुरू झाली. 


वैभव सारख्या अशा अनेक व्यक्‍तींना विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती, परितक्‍त्यापासून ते प्रत्येक होतकरू तरुणांना घरगुती कोंबडी पालनाचा व्यवसाय करता यावा, यासाठी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राने ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॅप’ व ‘गिरिराजा’ या दोन प्रकारच्या कोंबडी पालन व्यवसायाची पाऊल वाट सर्वांसाठी खुली केली आहे. अंडी उबवणी केंद्रात २०० रुपये शुल्कात २०० व्यक्तींनी कोंबडी पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. 


पशुसंवर्धन उपायुक्त अशोक नाईक यांनी दिलेली माहिती की, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राने ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॅप’ व ‘गिरिराजा’ या दोन कोंबड्या विकसित केल्या. त्या वर्षाला १६० ते १८० अंडी देतात. ७२ आठवड्याचा त्यांच्या जगण्याचा कालावधी आहे. याच काळात त्यांना गावरान चिकन म्हणून विकले जाते. अशा कोंबड्यांचा अंडी व्यवसाय सुरू करण्यासाठी ११ रुपयाला एक प्रमाणे विक्री केली जाते, तसेच थेट पिल्लांची विक्री होते. कोणीही व्यक्ती अशी अंडी खरेदी करून त्याची उबवण करू शकतो. तर कोंबड्या खरेदीही करता येतात. त्या आधारे स्वतःचा व्यवसाय करतात. 


पाच हजार रुपयात व्यवसाय सुरू करता येतो. एका कुटुंबाचे अर्थकारण चालेल एवढा नफा ही कमवता येतो. वरील दोन्ही जातींच्या कोंबडी या गावरान प्रकारातील आहेत. त्याची निर्मिती फक्त कोल्हापूरच्या अंडी उबवणी केंद्रात होते. त्यामुळे या उबवणी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेकांनी ही अंडी व कोंबड्या खरेदी केल्या आहेत, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

५२ लाखांचा महसूल 
कोरोनाकाळात अंडी व कोंबडी विक्रीतून ५२ लाखांचा महसूल शासनाला या विभागाने दिले आहे. एप्रिल ते ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ४९ हजार अंडी उबवण झाली आहे. ८४ हजार ५७५ पिल्लांची निर्मिती येथे झाली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com