कोल्हापूरात १५२० जणांना बूस्टर डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

कोल्हापूरात १५२० जणांना बूस्टर डोस

कोल्हापूर : जिल्ह्यात आज कोरोना प्रतिबंधक दक्षता डोस (booster dose) देण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील(satej patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस मुख्यालयाजवळील अलंकार हॉल येथे मोहिमेचे उद्‌घाटन झाले. एका दिवसात जिल्ह्यातील एक हजार ५२० जणांचे लसीकरण(vaccination) झाले. यात ६१० आरोग्यसेवक, ३७२ फ्रंटलाईन वर्कर आणि ५३८ व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला. शहरातील ५०९ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : शाळा सुरु राहिल्यास कारवाई करू

या वेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, की बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यात ६८ हजार लाभार्थी अपेक्षीत आहे. यात १७ हजार लाभार्थी शहरातील आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून शासनाने ही तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना दक्षता डोस देण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकही स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करुन घेत आहेत. पोलिसांसह सर्व फ्रंन्टलाईन वर्कर्संना बुस्टर डोस देण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: कोरोना नियमांची अंमलबजावणी करत शाळा सुरु ठेवा ; गणेश नायकूडे

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, की शहरातील ६० वर्षावरील व्याधीग्रस्त नागरीकांना पूर्ण काळजी घेऊन डोस देण्यात येईल. त्याचप्रमाणे शहरात दोन डोस झालेले १७ हजार फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. ६० वर्षांवरील ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. त्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. जस जसे नागरिकांचा नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल तस तसे पुढील डोस देण्याचे नियोजन केले आहे. ज्यांचा पहिला डोस कोविशिल्ड झाला आहे. त्यांना कोविशिल्डचाच बूस्टर डोस दिला जाणार आहे. जर कोवॅक्सिनचा डोस घेतला असेल तर कोवॅक्सिनचाच डोस दिला जाणार आहे.

हेही वाचा: एसटी संपावर निर्णय एेकताच इचलकरंजीत कर्मचाऱ्याचा मृत्यू

शहरातील ५०९ जणांचा समावेश

महापालिकेच्या लसीकरण केंद्रात आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. शहरात पहिल्या दिवशी ५०९ जणांना दक्षता डोस दिला. यात १२० आरोग्यसेवक, २७७ फ्रंटलाईन वर्कर, तसेच ११२ व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले. शहरात दक्षता डोसचे सुमारे १७ हजार लाभार्थी अपेक्षित आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top