सीमाभाग महाराष्ट्राशी चार महिने "अन कनेक्‍टेड'

Border Maharashtra unconnected for four months
Border Maharashtra unconnected for four months
Updated on: 

इचलकरंजी : हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यालगत असलेल्या कर्नाटकातील सीमा भागातील नागरिक अडीच महिने लॉकडाउनमुळे अस्वस्थच राहिले आहेत. शेती, उद्योग, व्यापार याचबरोबर शिक्षणाशी कनेक्‍टेड असलेली ही गावे या वर्षात तब्बल महापूर आणि कोरोनामुळे चार महिन्यांहून अधिक काळ महाराष्ट्राशी अनकनेक्‍ट राहिले आहेत. 

हातकणंगले तालुक्‍यातील हुपरीपासून शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूरपर्यंतचे अनेक गावालगत कर्नाटकची सीमा आहे. या सीमा भागातील नागरिक हुपरीतील चांदी उद्योग आणि बाजारपेठ, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग, शिक्षण, शेतीमाल विक्री, वैद्यकीय उपचार याबाबत संलग्न आहेत. जयसिंगपूर आणि कुरुंदवाड बाजारपेठेतही कर्नाटकातील नागरिकांचा नेहमीच संपर्क असतो. शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती, शेतीमाल विक्री अशा अनेक घटकांशी संबंधित हजारो नागरिकांचा संपर्क हा महाराष्ट्रातील गावांशीच नियमितपणे असतो.

इचलकरंजी शहरात दररोज सुमारे 10 हजार नागरिक कर्नाटकातील विविध गावातून उद्योग, नोकरीच्या निमित्ताने येतात. एवढेच नव्हे तर येथील भाजीपाला, दूध उत्पादन, शेतीमाल याला चांगली बाजारपेठ याच ठिकाणी उपलब्ध आहे. जयसिंगपूर आणि कुरुंदवाडमध्येही शेतीशी निगडित व्यवहार मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय जयसिंगपूर आणि इचलकरंजी या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी कर्नाटकातील अनेक गावांना हक्काचे ठिकाण बनले आहे. 

लॉकडाउनच्या काळात या सीमा भागातील नागरिकांना महाराष्ट्रातील या गावांशी संपर्क ठेवताच आला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना निपाणी, चिक्‍कोडीसह अन्य बाजारपेठ पर्याय म्हणून स्वीकारावी लागली. हीच अवस्था अन्य बाबींसाठीही घडली. महापुराच्या काळात तब्बल दीड ते दोन महिने महाराष्ट्र-कर्नाटक कनेक्‍शन बंद राहिले होते. आता पुन्हा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे कर्नाटकातील हजारो नागरिक महाराष्ट्राशी अनकनेक्‍टेड राहिले. 

दृष्टिक्षेप 
- वैद्यकीय उपचारासाठी सीमा भागाला महाराष्ट्राचा आधार 
- शेतीमाल विक्री व शेतीपूरक उद्योगासाठी कनेक्‍शन 
- वस्त्रोद्योगामुळे हजारोंना रोजगार 
- शिक्षणासाठीही सीमा भागातील महाराष्ट्राशी कनेक्‍शन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Opposition leaders prepare for a protest march against the government’s decision on Gokul Dairy in Kolhapur
Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election