

An eight-year-old girl from Borivade in Panhala taluka died after developing rabies-like symptoms.
esakal
देवाळे: बोरिवडे (ता. पन्हाळा) येथील रेवती संतोष चौगले (वय ८) या चिमुरडीचा रेबीजसदृश लक्षणांमुळे उपचारादरम्यान शनिवारी (ता. २१) पहाटे मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने तिचा पाठलाग केला होता. त्यावेळी घाबरून पळताना ती पडून जखमी झाली होती. मात्र, या घटनेत कुत्र्याने चावा घेतला आहे की नाही, हे लक्षात न आल्याने तिला रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली नव्हती.