कोल्हापूर : दोनवडेत ऑइलवरून दुचाकी घसरल्याने तरुण जागीच ठार  

boy dead in accident kolhapur donode
boy dead in accident kolhapur donode
Updated on

कुडित्रे - कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे (ता. करवीर) येथे तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइलवरून दुचाकी गाडी घसरल्याने तरुण रस्त्यावर आपटला गेला, यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. एकनाथ बंडा पाटील (वय २७ रा. सुळे ता. पन्हाळा )असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गाडीवर मागे बसलेला मामेभाऊ शुभम शिरगावकर (वय २५ रा. कोपार्डे ) हा तरुण जखमी झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. करवीर पोलिसात दुपारपर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हा तरुण कोपार्डे येथे आपल्या् मामाच्या गावी राहायला होता. आज कोल्हापूर येथे कामावर  जाण्यासाठी दुचाकीवरून मामाचा मुलगा शुभम शिरगावकरला घेऊन चालला होता. सकाळी ९.३०  वाजता वाकरे फाट्याच्या पुढे पंपाच्या मागील बाजूस मोठ्या तीव्र उतारावर आला असता, या उतारावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात ऑईल पडले होते. त्यावरून एकनाथ यांची  गाडी घसरली, यावेळी त्यांचे रस्त्यावर जोरात डोके आपटले आणि त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला. यामध्ये एकनाथ यांच्या  डोक्याला जबर मार लागल्याने व रक्त स्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. तर बरोबर असलेला मामेभाऊ शुभम शिरगावकर हा जखमी झाला आहे. जखमी शिरगावकर याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात  आले आहे. 

घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. तब्बल दोन तासांनंतर पोलिस घटनास्थळी हजर झाले. यामुळे वाहनचालकातून तीव्र संताप व्यक्त होत होता.


  
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com