बेळगाव : अनगोळ येथील मराठी शाळेत मोडतोड, समाजकंटकांचे कृत्य  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breakdown in Marathi school at Angol

या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. मात्र क्रिकेट खेळायला येणारे काहीजण शाळेतील वस्तूंची सातत्याने मोडतोड करीत आहेत

बेळगाव : अनगोळ येथील मराठी शाळेत मोडतोड, समाजकंटकांचे कृत्य 

बेळगाव : अनगोळ येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 6 मध्ये समाज कंटकानी मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे. याबाबत शिक्षकांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र शाळेत सातत्याने मोडतोड होत असल्याने पालक व विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 


शहरात अनेक ठिकाणी खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नसल्याने अनेकजण शाळेच्या मैदानावर क्रिकेट व इतर खेळ खेळत असतात सरकारी मराठी शाळा क्रमांक 6 च्या मैदानात  अधिक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. मात्र क्रिकेट खेळायला येणारे काहीजण शाळेतील वस्तूंची सातत्याने मोडतोड करीत आहेत. बुधवारी काही जणांनी शाळेच्या आवारात घुसून शौचालयाच्या दरवाज्यासह खिडकी व इतर साहित्याची मोडतोड केली असून गुरुवारी सकाळी शाळेत शिक्षक दाखल झाल्यानंतर मोडतोड झाल्याची बाब निदर्शनास आली यावेळी समाजकंटकांनी अधिक प्रमाणात मोडतोड केल्याचे पाहून शिक्षकाना धक्का बसला त्यानंतर  शिक्षकांनी याबाबत टिळकवाडी पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस याबाबत अधिक चौकशी करीत आहेत.


कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद आहेत. याचा फायदा उठवीत समाजकंटक शहरातील विविध शाळांच्या आवारात बसून दारू पिण्यासह इतर प्रकारचे धंदे करीत आहेत तसेच क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या काही जणांकडून खिडकी फोडणे, दरवाजे फोडणे असे प्रकार होत असून शाळेचे प्रवेशद्वार बंद असले तरी गेटवरून उडी टाकून आत प्रवेश केला जात आहे. त्यामुळे शाळांचे नुकसान होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा - 'दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी' 

काहीजण जाणीवपूर्वक शाळेतील वस्तूंची मोडतोड करीत आहेत. त्यांच्या कारवाई होणे आवश्यक आहे. वस्तूंची तोडफोड करून शाळेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
-जयश्री पाटील, सह शिक्षिका
 
संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top