रायबाग हेस्कॉम कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.jpg

रायबाग हेस्कॉम कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड

रायबाग: रायबाग येथील हेस्कॉम कार्यालयावर एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ३०) धाड टाकली. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार ही धाड टाकल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी, विविध कामासाठी हेस्कॉम कार्यालयाकडून लाच मागितल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिकांकडून गेल्या होत्या.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची भीती; कोल्हापूरकर काळजी घ्या!

ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब, वाहिन्या बसवण्यासाठी रकमेची मागणी करण्यात येत होती. लाच न दिल्यास परवाना देण्यास विलंब करण्यात येत असल्याच्या तक्रारी गेल्याने एसीबी पथकाने हेस्कॉम कार्यालयांवर छापा टाकला आहे.

रायबाग हेस्कॉम विभागीय कार्यकारी अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, शाखा कार्यालये, कार्यशाळा आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती कार्यालयांवर एकाच वेळी 30 पेक्षा जास्त एसीबी अधिकाऱ्यांच्या पथकाने एकाच वेळी धाड घातली. यावेळी येथील कागदपत्रांची पडताळणी करून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

हेही वाचा: इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनधारकांना करात मिळणार 'सवलत'

एसीबीचे (नॉर्दर्न झोन) एसपी बी. एस. नामगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी जे. एम. करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावचे निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच एच. सुनीलकुमार, धारवाडचे पी. एस. खडी, गदगचे वीरण्णा हळ्ळी, बागलकोटचे विजय मठपती यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Web Title: Bribery Prevention Department Raids Raibag Hescom Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliKolhapur