प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीवर विळ्याने वार ; गुढ्यातील प्रकार

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्ख्या भावाने बहिणीवर धारदार विळ्याने हल्ला
crime
crime
Updated on: 

आपटी (कोल्हापूर) : आज ही समाजात प्रेमविवाहाला (Love Marriage) अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. सैराट सारख्या चित्रपटातून देखिल याचे वास्तव दाखवण्यात आले आहे. समाजात अनेक घटना अशा घडतात यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला सुरवात होते. काही महिन्यांपूर्वीच अशीच एक घटना इचलकरंजीत घडली होती. आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुढ्यात देखिल असाच प्रकार घडला आहे. काय नेमकी घटना जाणून घेऊया...

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्ख्या भावाने बहिणीवर धारदार विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हा प्रकार पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुढे येथे काल सकाळी घडला. या प्रकरणी नागेश पांडुरंग तेली (वय २०, रा. निगवे दुमाला ता. करवीर) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

crime
पन्हाळागडाची 'नव्या वाटेवरील' भ्रमंती
Summary

सख्ख्या भावाकडून शांत डोक्याने झालेल्या कृत्याने गुढे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बाबत जखमी सौ. विश्रांती अविनाश चिखलकर (२३, रा. गुढे ता. पन्हाळा) यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याची दखल घेत पन्हाळा पोलिसांनी दोन तासात संशयित नागेशला निगवे येथील घरातून ताब्यात घेतले. जखमी विश्रांती हिच्या पाठीत व उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे. तिला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सख्ख्या भावाकडून शांत डोक्याने झालेल्या कृत्याने गुढे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला सकाळी दहाला झाला. गुढेचे पोलिसपाटील केशव कदम यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shivaji University campus 13000 trees
Farmers Block Sugarcane-Laden Tractors at Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory During a Price Protest in Kolhapur
Kolhapur flower exhibition at Police Garden
Cleaning Staff Work Around the Clock to Keep Kolhapur’s Ambabai Temple Spotless During Navratri
Marathi News Esakal
www.esakal.com