जिल्हाधिकारी येडगे यांनी स्वतः रंकाळा तलावात उतरून स्वच्छता केली. रंकाळ्याचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या.
फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळा तलाव (Rankala Lake) प्रदूषित होऊ नये यासाठीच्या कामांना प्राधान्य द्या. रंकाळ्याचे प्रदूषण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे (District Collector Amol Yedge) यांनी महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय खाद्यपदार्थ विक्रेते यांना स्वच्छता ठेवण्याचे सांगत तलावात म्हशी धुणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्याचा प्रत्यक्ष इशारा दिला.