उसाच्या एफआरपीच्या दराच्या तुलनेत ही वाढ अत्यल्प असून, त्यात आणखी वाढ करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे. याशिवाय साखरेच्या हमीभावातही वाढ करण्याची मागणी उद्योगातून होत आहे.
कोल्हापूर : कच्च्या तेलावरील (Crude Oil) अवलंबित्त्व कमी करणे, परकीय चलनात बचत करणे व पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकारने आज सी-हेवी मोलॅसिसच्या दरात (C-Heavy Molasses Rates) प्रतिलिटर तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.