कोल्हापूर : केंद्र व राज्य शासन प्रधानमंत्री सूर्यघर, मागेल त्याला सौर कृषिपंप (Solar Agricultural Pump), मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेबाबत जनजागृती करत त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, यासाठी प्रयत्न करत आहे. दुर्गम भाग असो की, सधन तेथे कोणत्याही परिस्थितीत वीज पोहोचली पाहिजे, यासाठी महावितरणतर्फे (Mahavitaran) प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या वीज वापरात फरक आहे. मात्र, वीज सेवेचा लाभ उठवताना वीज चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.