Kolhapur Cashew : गोदाम प्रकल्प उभारणीस मान्यता काजू फळ पीक विकास योजना; लाभ घेण्याचे आवाहन
Cashew Warehouse : काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. काजू फळ पीक विकास योजनेंतर्गत गोदाम उभारणीस मान्यता देण्यात आली असून, पाच वर्षांसाठी ६२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात काजू फळ पीक विकास योजनेंतर्गत गोदाम उभारणीची योजना राबविण्यात येणार आहे. यात पाच वर्षांसाठी ६२ कोटी ५० लाख अर्थसहाय्याची तरतूद केली आहे.