
कोल्हापूर : राजकारणात कमरेला ‘पिस्तूल’ लावून गाजलेल्या माजी नगरसेवकाने सीमाभागात बस्तान बसवले आहे. ‘गोव्याची मजा’ कोल्हापुरात देण्यासाठी त्याने ‘कॅसिनो’ सुरू करत तरुणाईला चांगलेच गुंतवले आहे. महाविद्यालय, शाळेच्या परिसरातच सुरू झालेल्या या नव्या ‘धंद्यातून’ त्याची कमाई जोरात आहे. कर्नाटकातील गुन्हेगारांचा वावर असलेल्या या पंधरा किलोमीटर भागात गांजा तस्करी, गुटखा तस्करीसह मटका, जुगार अड्ड्यांमधून दिवसाला दोन कोटींची उलाढाल सुरू आहे.