Kolhapur Farmer : फ्लॉवरला अवघे चार रुपये! आवक वाढली, पण शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
Cauliflower Price Crash : स्थानिक व मोठ्या शहरांतील बाजारपेठेत फ्लॉवरची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर अचानक घसरले.थंडी पिकास पोषक ठरल्याने उत्पादन वाढले, मात्र वाढलेल्या आवकेमुळे बाजारात दर टिकू शकले नाहीत.
दानोळी : फ्लॉवरला तीन महिन्यांपासून समाधानकारक दर होता. मात्र, १६ डिसेंबरपासून दर कमी होत आता तो चार रुपयांपर्यंत आला आहे. स्थानिक बाजारपेठेसह मोठ्या शहरातील बाजारपेठेत आवक वाढल्याच्या कारणाने दर पडला आहे.