esakal | कोल्हापुरातील तालमीनी अशी घेतली खबरदारी ःपरवानगी असेल तरच हॉलमध्ये प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

 Caution of training in Kolhapur

कोल्हापूर ः यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील तालमी आणि तरूण मंडळांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली आहे. चार फुटापर्यंतच्याच मूर्तींची सर्वत्र प्रतिष्ठापना झाली आहे. मात्र, गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी असल्याने साठहून अधिक तालमींच्या हॉलमध्ये यंदा एकाच ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे.

कोल्हापुरातील तालमीनी अशी घेतली खबरदारी ःपरवानगी असेल तरच हॉलमध्ये प्रवेश

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर ः यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील तालमी आणि तरूण मंडळांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली आहे. चार फुटापर्यंतच्याच मूर्तींची सर्वत्र प्रतिष्ठापना झाली आहे. मात्र, गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी असल्याने साठहून अधिक तालमींच्या हॉलमध्ये यंदा एकाच ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे. या ठिकाणी गर्दीतून संसर्ग होवू नये, यासाठी तालमीने परवानगी दिलेल्यांनाच तालमीच्या हॉलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 
शिवाजी पेठेतील सरदार तालमीने याबाबतचा उत्सव काळातील नियमांचा फलकच लावला असून सोशल मीडियावरूनही या पद्धतीचे आवाहन केले आहे. तालमीत यंदा बाप्पांबरोबरच चॉंदसाहेब या मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना झाली आहे. घरगुती गणपती विसर्जनावेळी लहान मुलांना बंधन घातले आहे. तालमीच्या विसर्जन कुंडाजवळ प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन किंवा तीनच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. तालीम परिसरातील महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रम फक्त घरी करावेत, असे आवाहनही तालमीने केले आहे. गंगावेश धोत्री तालीम परिसरात विविध हॉस्पिटल्सची संख्या अधिक आहे. तालमीत गणेशमूर्ती आणि पंजाची प्रतिष्ठापना झाली असून गर्दी होवू नये, यासाठी सुमारे शंभर फुटांपर्यंतचा परिसर सील केला आहे. 

हार, फेट्यांना फाटा 
मोहरममध्ये पाचव्या किंवा सहाव्या दिवसानंतर मानाच्या पंजांसाठी फेटे, हार आणि नैवेद्य अर्पण करण्याची शहर आणि परिसरात परंपरा आहे. मात्र, यंदा भाविकांनी फेटे, हार किंवा नैवेद्य आणू नयेत. बहुतांश तालमींनी पंजांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन ः यशवंत केसरकर


 

loading image
go to top