गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्यात ठिबकपद्धतीने पिकाला पाणी देण्यावर कल वाढला आहे. अतिपाण्याच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे.
कुडित्रे : लोकप्रतिनिधींच्या वतीने शेतकऱ्यांना (Farmers) ठिबकसाठी (Drip Yojana) अनुदान दिल्याचा गाजावाजा केला जातो. मात्र, दरवर्षी ठिबकचे अनुदान थकलेले असते. केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांचे सात कोटी पाच लाख ५९ हजार रुपये ठिबकचे अनुदान थकले आहे. यामुळे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी कृषी खात्यात (Agricultural Department) हेलपाटे मारत आहेत. जिल्ह्यात १५४२ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून तातडीने अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.