जोतिबा डोंगर : लाखो भाविकांच्या हृदयातून दुमदुमणारा ‘चांगभलं’चा गजर, विविधरंगी सातशे ते आठशे सासनकाठ्या, गुलाल-खोबऱ्याची अविरत उधळण, भक्तिरसात तल्लीन झालेले आबालवृद्ध अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा (Jyotiba Chaitra Yatra) अमाप उत्साहात झाली.