esakal | दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग
sakal

बोलून बातमी शोधा

दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील (kolhapur district) व शहरातील रूग्णसंख्या सातत्याने कमी होत असुनही सरकारने व्यापार सुरू करायला परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असुन व्यापारी अत्यंत संतप्त असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. तसेच आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांचे मत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेतले जाणार असून तेथूनच पुढे व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आता पोलिसांना (police) आणि शासनाला घाबरण्याचे कारण नाही, व्यापाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

शासन व प्रशासनाच्या सर्वस्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा होती. पण व्यापाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. व्यापाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी टोकाची भुमिका घेतील असा इशाराही ललित गांधी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

हेही वाचा: 'सारथी' ने स्थानिक रोजगाराला बळ द्यावे : समरजितसिंह घाटगे

व्यापाऱ्यांची निर्णायक भुमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवारी (16) राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या व्यापक बैठकीचे नियोजन आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु तिसरी लाट येईल म्हणुन व्यापार कीती काळ बंद ठेवणार? कोणताही शास्त्रीय आधार नसलेला तोडका मोडका लॉकडाऊन कोरोनावर नाही तर व्यापारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आघात करत आहे. व्यापारी आवश्यक ती खबरदारी घेतील. लसीकरण करून घेत आहेत. आता आणखी वाट बघणे शक्य नाही म्हणुन ताबडतोब परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली.

loading image