
-सुनील कोंडुसकर
चंदगड : कोवाड (ता. चंदगड) येथे शनिवारी मध्यरात्री परप्रांतीय चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून सुमारे १८ लाख रुपये लुटले. या घटनेमुळे एटीएमची सुरक्षा चर्चेत आली आहे. बँकांनी एटीएमवर विमा सुरक्षा उतरली असून, त्याच भरवशावर त्या निर्धास्त आहेत, मात्र चोरीची घटना आणि परिसरात निर्माण होणारे भीतीचे वातावरण यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.