Kolhapur Wild Elephant : खळणेकरवाडीत ‘राजा’ हत्तीचा धुमाकूळ; घरासमोरील मोटार फोडून २५ हजारांचे नुकसान
Raja Damages Car : चंदगड तालुक्यातील खळणेकरवाडी येथे गुरुवारी रात्री ‘राजा’ हत्तीने घरासमोर उभी असलेली मोटार फोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंदगड : नागवे (ता. चंदगड) पैकी खळणेकरवाडी येथे गुरुवारी रात्री ‘राजा’ हत्तीने विराज विजय सामंत यांच्या दारासमोर लावलेल्या मोटारीवर हल्ला चढवला. यात मोटारीचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले.