esakal | 'राज्यात शिवशाही नव्हे ठोकशाही; पूजा चव्हाण, रेणू शर्माला न्याय का नाही'?
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil criticism on shiv sena political marathi news

 राज्यात शिवशाहीचे सरकार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष हे ठोकशाहीचे सरकार आहे. इथे न्याय होत नाही. तो होत असता तर धनंजय मुंडे प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो

'राज्यात शिवशाही नव्हे ठोकशाही; पूजा चव्हाण, रेणू शर्माला न्याय का नाही'?

sakal_logo
By
अजित झळके

सांगली :  राज्यात शिवशाहीचे सरकार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष हे ठोकशाहीचे सरकार आहे. इथे न्याय होत नाही. तो होत असता तर धनंजय मुंडे प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो सरकारने तटस्थपणे कारवाई केली असती. ती दडपली जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.


ते म्हणाले, "धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्माने इतके गंभीर आरोप केले. मुंडे यांनी स्वतः कबूल केले की त्यांचे करुणा शर्मासोबत संबंध आहेत, त्यांना दोन मुले आहेत, त्यांना त्यांचे नाव लावले आहे. त्यांच्या त्या पत्नीने आरोप केला की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मुलांना बंगल्यात कोंडून ठेवले आहे. इतके गंभीर घडूनही त्याकडे कानाडोळा केला जातो. आता पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव येते आहे. ते दरवाजा तोडायला सांगत आहेत, मोबाईल ताब्यात घे म्हणत आहेत. त्याच्या ऑडिओ क्‍लीप समोर आल्या आहेत. त्यातील दोघांना अटक करून दोन तासांत त्यांना सोडले गेले. तिचा लॅपटॉप कुठे आहे? हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे.

माध्यमांनी याच्या मुळाशी गेले पाहिजे. हे एकच प्रकरण नाही, तर राज्यात कार्यकर्त्याला एक मंत्री बंगल्यात नेवून मारतो; एकाच्या जावयाचे नाव ड्रग्ज प्रकरणात येते, एका युवा मंत्र्याच्या नावाची चर्चा एकाच्या आत्महत्येशी जोडली जाते. त्यानंतरही काही होत नसेल तर याला शिवशाहीचे सरकार कसे म्हणायचे?''
राज्य सरकारचे "नाचता येईना, अंगण वाकडे', असे झाल्याची टीका करताना

  पाटील म्हणाले, "कोरोना संकटात सगळे केंद्राने दिले. राशन दिले, इंजेक्‍शन दिले, औषधे दिली, कीट दिले, राज्य सरकारने काय केले? जीसीएटीच्या नावाने ओरड करण्यासाठी त्याची व्यवस्था समजून घ्यावी, अभ्यास करावा. त्याआधी राज्य शासनाने कर्जमाफीचे काय झाले? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली का? बांधावर जावून हेक्‍टरी 50 हजार रुपये देण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे काय झाले? याची उत्तरे द्यावीत.''


पवार मुंबईचे मतदार
 
शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबतच्या प्रश्‍नावर काल "ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे'', असा टोला लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी काल शरद पवार यांच्याकडून पुजा चव्हाण प्रकरणात न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी त्यावर असे उत्तर देणे अपेक्षित नव्हते. मी कोथरूडला गेलो, ठीक ! पण, तेही माढ्याला गेले. एकदा घोषणा करून मागे फिरले. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. ते मुंबईत राहतात. त्यांचे मतदार यादीतील नाव मुंबईत आहे. बाहेर जावून राहणे यात चूक आहे, पक्ष हितासाठी ते करावे लागते.''  

संपादन- अर्चना बनगे

loading image