Kolhapur Flood I कोल्हापुरातील पूरग्रस्तांना तुटपुंजी मदतही मिळालेली नाही - चंद्रकांत पाटील | Chandrakant Patil News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil News

येत्या पावसाळ्यासाठी सरकारने काय तयारी केली आहे, असा सवाल चंद्रकांत पाटलांचा सवाल

कोल्हापुरातील पूरग्रस्तांना तुटपुंजी मदतही मिळालेली नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी आज भाजपाकडून टाहो मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भाजप पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली होती. मात्र ठाकरे सरकारकडून २०२१ मध्ये तुटपुंजी मदत जाहीर झालेली नाही. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने कोणतेही ठोस पावले उचलेली नाही. येत्या पावसाळ्यासाठी सरकारने काय तयारी केली आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. (Chandrakant Patil News)

हेही वाचा: अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी गोंधळ, इतिहासाचार्य असा उल्लेख करत भाजपचा पवारांना टोला

यावेळी ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अचानक पूर आला तेव्हा १५ दिवस हेलिकॉप्टर नागरिकांच्या मदतीसाठी उभे होते. एनडीआरएफच्या तुकड्या तात्काळ उपलब्ध केल्या होत्या. सांगलीतील एका गावातील बोट उलटली ही घटना सोडली तरी एकही बळी या महापुरात गेलेला नव्हता. कित्येक लोकांचे जीव त्याकाळी सरकारच्या नियोजनामुळे वाचले होते. प्रशासन आणि सरकारही ही मोठी ताकद असते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या टाहो आंदोलनात कोल्हापूरमधील कुंभार समाजही सहभागी झाला होता. त्यांनी प्रशासनाकडे गणपती तयार करण्यासाठी महापूर येणारी नाही जमीन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे. शहरातील दसरा चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

हेही वाचा: आधी बाहुलीला फाशी दिली...मग स्वत: घेतला गळफास, पुण्यात ८ वर्षांच्या मुलाचं कृत्य

Web Title: Chandrakant Patil Criticizes Thackeray Govt Kolhapur Flood Situation Preparation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top