सलगर चहाचे उलगडले ‘अमृततुल्य’ रहस्य.

chat on startup boards dadu salgar of the salgar nectar group Opex Startup Accelerator and sakal Media Group Jointly program
chat on startup boards dadu salgar of the salgar nectar group Opex Startup Accelerator and sakal Media Group Jointly program

कोल्हापूर : सलगर अमृततुल्य चहाला एक ब्रॅंड बनवून वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या सलगर अमृततुल्य समूहाच्या अवलिया दादू सलगर यांच्याशी स्टार्टअप कट्ट्यावर गप्पा रंगल्या.  ओपेक्‍स स्टार्टअप एक्‍सेलरेटर आणि सकाळ माध्यम समूह यांनी संयुक्तपणे प्रायोजित केलेला स्टार्टअप कट्ट्याचा सहावा भाग ओपेक्‍स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला.


दादू सलगर यांनी शेती कसली, पुण्यात काही काळ सिक्‍युरिटीची नोकरीही केली. तिथे फिरताना एखादा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत रसंवतीगृह सुरू केले. पुढे चहा चालू केला. चहाच्या चवीने तो प्रसिद्ध झाला आणि लोकांनी फ्रॅंचायझी मागण्यास सुरवात केली. आज अमृततुल्यच्या १७५ शाखा आहेत. या प्रवासाबद्दल ते सांगतात,‘‘कोणत्याही बिजनेसमध्ये उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. उत्तम गुणवत्ता जपण्यासाठी कोणतीही तडजोड करत नाही. फूडचेनमध्ये जास्त उत्पादने एकच छताखाली ठेवली तर दर्जा खालावतो. 


भांडवल गुंतवणूक कामगारांच्या जीवावर कधीच व्यवसाय यशस्वी होत नाही, तर मालकानेही कामगारांच्या बरोबरीने घाम गाळला पाहिजे. व्यवसाय करताना लोकांच्या प्रतिक्रियांची भीती बाळगू नये. कोणताही व्यवसाय करताना छोट्या भांडवलातून व्यवसाय सुरू करावा. स्टार्टअपच्या सुरवातीच्या काळात मोठी इन्व्हेस्टमेंट करू नये त्याचप्रमाणे स्टार्टअप सुरू करण्याआधी त्याचा अभ्यास असावा.’’

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com