तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे ? मग ही बातमी वाचाच

Chrome company in Kolhapur Serological survey of 1000 people
Chrome company in Kolhapur Serological survey of 1000 people
Updated on: 

कसबा बीड  (कोल्हापूर) :  मुंबई, पुणे शहरांबरोबर कोल्हापूर कोरोना हॉटस्पॉट बनत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार सुरू आहेत; तर काही लोक निव्वळ भीतीने मरण पावले आहेत. पण, आता कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण उपचार घेणाऱ्या लोकांपेक्षा लाखो लोकांना कोल्हापुरात कोरोना होऊन गेला आहे, हे कळलेलेही नाही. यासाठी कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. धनंजय लाड यांची क्रोम क्‍लिनिकल रिसर्च ॲण्ड मेडिकल टुरिझम ही कंपनी जिल्ह्यात १००० लोकांचा कोरोनाचे प्रतिपिंड (अँन्टी बॉडीज) चाचणी सर्वेक्षण (सेरॉलॉजीकल सर्वेक्षण) करणार आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांनी क्रोमला सर्वेक्षण प्रकल्प करण्यास सांगितले आहे. शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नैतिक समिती (एथिक कमिटी) व भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआर यांच्या मान्यतेचे सोपस्कारही पूर्ण झाले आहेत. त्यानुसार ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचा संकल्प आहे.


सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च सुमारे वीस लाख रुपये इतका आहे. एवढा खर्च करणे सध्या शक्‍य नसल्यामुळे डॉ. लाड यांनी विविध सामाजिक संस्था, उद्योजक व दानशूर व्यक्तींकडून निधी उभारुन हा प्रकल्प तातडीने राबवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.कोल्हापुरात आजअखेर पंधरा हजार आठशे लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यावर शासनाचा कोठ्यावधीचा निधी खर्ची पडला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. जनजीवन विस्कळीत झाले, तर दुसरीकडे लाखो लोकांना कोरोना संसर्ग होऊन गेला (हर्ड इम्युनिटी) आहे, हे कळलेही नाही किंवा त्याची नोंद कुठेही झालेले नाही. त्यांच्यावर शासनाचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. 

मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या दाटीवाटी च्या परिसरात लोकांध्ये (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला आळा बसला होता. पुणे, मुंबई, दिल्ली येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करून नागरिकांत कोरोना विरुद्धची प्रतिपिंडे तयार झाली असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. कोल्हापुरातही याच पद्धतीने या सर्वेक्षणाची आखणी केली आहे. 

असे होणार सर्वेक्षण

 पहिल्या टप्प्यात १०० लोकांचे   सर्वेक्षण
 कोल्हापूर शहरात पूर्वी कंटेन्मेंट झोन         असलेल्या, नंतर खुल्या केलेल्या  परिसराची यासाठी निवड
 शहरातील ५०० व्यक्तींना  निवडण्यात येणार
 इचलकरंजीतील २५० व्यक्तींची  होणार निवड
करवीर तालुक्‍यातील २५० लोकांची  होणार निवड
निवडलेल्या लोकांचे एक मिली रक्त घेतले जाणार 
 रक्तातील प्रतिजैविके (आयजीजी  अँन्टिबॉडीज) तपासणार 
व्यक्तीला कोरोना झाला की नाही हे  तत्काळ कळणार  कोल्हापुरातील संसर्गाचा वेग, पुढील  दिशा ठरविण्यास मदत होणार

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Kolhapuri Jaggery Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com