पर्यटनासाठी कोल्हापूर शहर गजबजले

 The city of Kolhapur is bustling for tourism
The city of Kolhapur is bustling for tourism
Updated on: 

कोल्हापूर, ः गेल्या आठवड्यातील सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यामुळे शहरात आठ महिन्यांनी पर्यटकांची मोठी गर्दी अनुभवायला मिळाली. काल आणि आजही सुट्टीचा मुहूर्त साधत पर्यटकांनी शहरात मोठी गर्दी केली. त्यामुळे फेरीवाल्यांसह विविध विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून एकूणच उलाढालीचा विचार करता त्यांच्याकडून समाधान व्यक्त होऊ लागले आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्याशिवाय करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरही दर्शनासाठी बंद असल्याने पर्यटकांचा शहरात येणारा ओढा अत्यल्प राहिला. 
मात्र, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने हळूहळू गर्दी वाढू लागली. गेल्या आठवड्यापासून दर्शनाची वेळ पुन्हा दोन तासांनी वाढवल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येवू लागले आहेत. दर्शनानंतर रंकाळा, कणेरी मठ, न्यू पॅलेस आदी परिसरात त्यांची गर्दी होते. यानिमित्ताने या परिसरातील विक्रेत्यांची उलाढाल वाढते. त्याशिवाय महाव्दार रोडवरही खरेदीसाठी मोठी गर्दी होते. पर्यटकांच्या अशा गर्दीचा अनुभव आता पुन्हा मिळू लागला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक खबरदारी मंदिरात घेतली जात असली तरी इतर ठिकाणी सोशल डिस्टन्स व इतर उपायांचा फज्जा उडाला आहे. 
महालक्ष्मी अन्नछत्रातही आज मोठ्या संख्येने भाविक प्रसादासाठी दाखल झाले. दिवसभरात दोन हजारांवर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. रंकाळ्यावर गर्दी कायम असली तरी न्यू पॅलेस आणि इतर ठिकाणीही दिवसभर गर्दी राहिली. तब्बल आठ महिन्यांनी आता समाधानकारक उलाढाल होत असल्याचे अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल विक्रेते महादेव ऱ्हाटणकर यांनी सांगितले तर महाव्दार रोडवरील फेरीवाल्यांकडेही दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी राहिली. 

वाहतूकीची कोंडी 
शहरात पर्यटकांची गर्दी झाली की ताराबाई रोडपासून पुढे रंकाळा टॉवरपर्यंत वाहतूकीची कोंडी होते. रंकाळा परिसरात मोठ्या संख्येने वाहनांचे पार्किग केले जाते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूकीची कोंडी जाणवत असली तरी वाहतूक पोलिसांनी त्याचे योग्य नियोजन केले आहे.
-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com