शहर प्लास्टिकमुक्तीसाठी आराखडा 

The city plans for plastic release
The city plans for plastic release

कोल्हापूर : कोल्हापूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठीचा कृती आराखडा महापालिका आरोग्य विभागाने तयार केला आहे. 1 मार्चपर्यंत शहर प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तसा निर्धार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कृती आराखडा तयार केला आहे. 

15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान शहरातील संपूर्ण शाळा, महाविद्यालये याठिकाणी समक्ष जावून प्लास्टिक, थर्माकॉल आदी प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येईल. नागरिकांनी प्लास्टिकविरोधात जागरूकता, प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यास मदत करण्यासाठी सर्व शाळा, महाविदयालय रूग्णालये, निवासी क्षेत्र, चित्रपट गृहे, रस्ते, फुटपाथ परिसर, रंकाळा तलाव, नदीघाट परिसर, पर्यटन स्थळे, बागा, झोपडपट्टी आदी ठिकाणचे प्लास्टिक वेचा मोहिम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत शालेय विद्यार्थाची रॅली, महाविद्यालय स्तरावर एनएसएस., एनसीसी, स्काऊट आणि गाईड, इको क्‍लब, रोटरी क्‍लब यांच्यात जनजागृती, स्थानिक न्युज चॅनेलस्‌, मिडीया, स्थानिक वृत्तपत्रात, रेडीओ मिरची, टॉमेटो एफएमएम आदी माध्यमाव्दारे मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येईल. व्यापारी असोसिएशन, बार कॉन्सील, बचत गट, फेरीवाले, हार, बुके विक्रेते, औद्योगिक व्यावसायिक, क्रिडाई, तालीम मंडळाचे अध्यक्ष आदीत प्लास्टिक विरोधातबाबत जनजागृती करणे आणि बैठक आयोजित करण्यात येतील. 

188 जणांवर कारवाई ; 9 लाख वसुल 
15 फ्रेबुवारीअखेर प्लास्टिक वेचा मोहिमेअंतर्गत शहरात मुख्य रस्ते, मोकळी जागा, शाळा, कॉलेज आदी ठिकाणचे अंदाजे 2 टन प्लास्टिक जमा केले. आज आखेर प्लास्टिक व थर्माकॉल प्रतिबंधात्मक कारवाईत एकूण 188 व्यावसायिकांवर कारवाई करुन दंड 9 लाख 45 हजार रूपये वसुल केले आहेत. 

प्लॉस्टिक जमा करण्यासाठी 13 केंद्रे 
यावेळी आरोग्य विभागातर्फे प्लास्टिक, थर्माकॉल आदी वस्तुचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य निरिक्षक यांची पाच पथक तयार केले आहे. नागरिकांनी प्लास्टिक व थर्माकॉलपासुन तयार केलेल्या वस्तू जमा करण्यासाठी आरोग्य स्वच्छता विभागाच्या 13 संकलन केंद्रात सोय आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com