
कोल्हापूर : घरासमोर गाडी लावल्याची विचारणा केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांसह तिघांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. मारहाणीत लता आप्पासाहेब येडाळे (वय ५६), सुजय आप्पासाहेब येडाळे (३४), अमित आप्पासाहेब येडाळे (३२, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली) जखमी झाले. याप्रकरणी दोघा अल्पवयीन संशयितांसह चौघांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.