Container Accidentesakal
कोल्हापूर
क्लासला जाताना कंटेनरच्या धडकेत बारावीचा मुलगा जागीच ठार; घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव, डोक्याला गंभीर मार लागला अन्..
Container Accident : उत्कर्ष पाटील हा बारावीचे शिक्षण घेत होता. खासगी क्लाससाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास तो मोपेडवरून टोपहून कसबा बावड्याकडे निघाला होता.
नागाव : कंटेनरच्या धडकेत (Container Accident) टोपचा मोपेडस्वार मुलगा जागीच ठार झाला. उत्कर्ष सचिन पाटील (वय १७, रा. महाडिक कॉलनी, टोप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. शिये - कसबा बावडा मार्गावर (Shiye-Kasba Bawda Marga) शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मोहिते गॅरेजसमोर दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
