Vegetable Market : गवारीचा भाव थेट २०० पार! इचलकरंजी भाजीपाला बाजारात महागाईचा झटका
Cluster Beans Price Surge : इचलकरंजी भाजीपाला बाजारात महागाईची झळ पुन्हा जाणवू लागली आहे. गवारीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने दर थेट २०० रुपयांच्या पुढे गेले असून, लिंबूचे भावही सातत्याने वाढत आहेत.
Vendors selling vegetables at Ichalkaranji wholesale market amid price surge.
इचलकरंजी : भाजीपाला बाजारात गवारीचा तुटवडा आहे. आवक नसल्याने दर दुप्पट झाले असून, किलोचा भाव २०० पार गेला आहे. थंडीमुळे आवक कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.