पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये पन्हाळ्याचा समावेश असून, हा राज्यातील पहिला जागतिक वारसा असणारा किल्ला ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पन्हाळा : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) निर्माण केलेले स्वराज्य हा भारताचा इतिहास आहे. पन्हाळा स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला आहे. शिवकाळामध्ये हा किल्ला जसा होता तसाच पुन्हा निर्माण करण्यात येईल. यासाठी लागेल तेवढा निधी देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केली. त्याचवेळी त्यांनी जोतिबा प्राधिकरणही पंधरा दिवसांत मंजूर करणार, अशी घोषणादेखील केली. पन्हाळागडावरील १३ डी थिएटरचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.