इचलकरंजी : आलमट्टी धरणाच्या (Almatti Dam) उंचीविरोधात आपली लढाई सुरूच आहे. त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. आवश्यकता वाटल्यास याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) लढा देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे दिली. इचलकरंजीला पाणी देणार, हा आपला शब्द आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबतचा उचित निर्णय घेऊन इचलकरंजीसाठी (Ichalkaranji) पाणी आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.