पंचकल्याणक पूजेसाठी आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी कामाचा आढावा घेतला.
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये (Panchkalyanak Festival Nandani) रविवारी बटूंवर मौजीबंधन उपनयन संस्कार करण्यात आले. दरम्यान, रविवारी दीड लाखांहून अधिक श्रावक-श्राविकांसह मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या.