esakal | शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक

मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणामुळे नृसिंहवाडीत सभेवेळी जलसमाधी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.

शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक

sakal_logo
By
जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी : पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आज चर्चेसाठी निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निमंत्रणामुळे नृसिंहवाडीत सभेवेळी जलसमाधी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा शेट्टी यांनी केली. आज दुपारी तीनला मुंबईत ही बैठक होईल. (Mumbai)

हेही वाचा: 'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

कृष्णा व पंचगंगेच्या महापुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाने न्याय द्यावा. यांसह विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले होते. अखेर १५० किलोमीटर अंतर पार करून ही परिक्रमा नृसिंहवाडी येथे पोचली. सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास नृसिंहवाडीत जलसमाधी घेण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिलेला होता.

हेही वाचा: महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट - संजय राऊत

काल परिक्रमा नृसिंहवाडीत पोचली, तेव्हा शेकडो कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. तेथे सभेनंतर शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार होते, त्यापूर्वीच इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी शेट्टी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी तीनला ‘वर्षा’ बंगल्यावर चर्चेसाठी बैठकीचे निमंत्रण दिल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर शेट्टी यांनी सभेत जलसमाधी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.

loading image
go to top