esakal | 'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर - या सरकारला राजु शेट्टी व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का? असा सवाल स्वाभिमानीच्या युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केला आहे. मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

ते म्हणाले, आज राजु शेट्टी त्यांच्यासोबत हजारो पूरग्रस्त शेतकरी नृसिंहवाडीला नदीत जलसमाधी घेण्यासाठी कुच करत आहेत. या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गावोगावी महिलांनी शेट्टींचे औक्षणाने स्वागत केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत तोकड्या स्वरूपाची असल्याने नुकसान भरून निघणार नाही. पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. या रोषाला वाचा फोडण्याचे काम ते करत आहेत.

हेही वाचा: 'परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही; भुमिका वाडीतच जाहीर करु'

पुढे ते म्हणाले, आज शेवटचा दिवस असताना हे सरकार राजु शेट्टींसोबतच्या हजारो शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी जलसमाधी घेण्याच्या निर्णयापर्यंत गेले असताना सरकार पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप रणजित बागल यांनी केला आहे. आता सरकारने शेतकऱ्यांच्या रोषाचा कडेलोट होण्याआधी आज तात्काळ मंत्रीमंडळ बैठक बोलावून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेट्टी यांच्या मागणीनुसार सन्मानजनक मोबदला देवुन, हा पेटलेला वणवा विझवा' असे आवाहन बागल यांनी राज्यसरकारला केले आहे.

हेही वाचा: Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

यादरम्यान राजु शेट्टी आणि चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. आज निर्णय न झाल्यास पेटलेल्या शेतकऱ्यांच्या या वणव्यात सरकार व त्यांचा अहंकार दोन्ही भस्मसात होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

loading image
go to top