esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) उद्या (ता. ३) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उजळाईवाडी विमानतळ येथे सकाळी नऊ वाजता त्यांचे विमानाने आगमन होईल. नंतर ते शिरोळच्या (shirol) दौऱ्यावर जातील. पूरग्रस्त भागाची पाहणी तसेच स्थलांतरितांच्या छावणीला भेट देतील. दुपारी त्यांचे शहरात आगमन होईल. (kolhapur city)

हेही वाचा: मदत राहुदे, फक्त लढ म्हणा; बदनामी न करण्याचं चिखलीकरांचं आवाहन

शिवाजी पूल तसेच शाहूपूरी कुंभार गल्ली येथे ते भेट देतील. शासकीय विश्रामधाम येथे पूरस्थितीचा तसेच त्यासंबंधी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतील. कोल्हापुरला (kolhapur flood) महापूराचा विळखा पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिरोळमध्ये त्याची मोठी झळ बसली आहे. पंचनामे झाल्यानंतर कोणत्या स्वरूपात मदत द्यायची हे निश्‍चित होईल. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री कोणती घोषणा करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

loading image
go to top