esakal | कोल्हापूर : राहुल रेखावार नवे जिल्हाधिकारी; दौलत देसाईंची बदली
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : राहुल रेखावार नवे जिल्हाधिकारी; दौलत देसाईंची बदली

कोल्हापूर : राहुल रेखावार नवे जिल्हाधिकारी; दौलत देसाईंची बदली

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील 47 गावातील 55 हजार एकर हेर सरंजामची जमिन 60 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या मालकीची करुन देणारे, शहरातील बी टेन्यूअर जमिन 40 हजार मिळकतदारांच्या कायम नावावर करणारे, मास्क नाही, प्रवेश नाही हे घोषवाक्‍य राज्याला देणारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह सचिवपदी बदली झाली. तर, त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बीज उत्पादक महामंडळाचे कार्यकारी संचालक राहुल अशोक रेखावार यांनी नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. दोन दिवसांत ते आपला कार्यभार स्विकारतील. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूका शांततेत आणि नियोजनबध्द पार पाडल्या. याशिवाय, महापूराच्या संकटातही त्यांनी दमदार कामगिरी करत दिलासा दिला. दरम्यान, जिल्ह्यात पन्नास ते साठ वर्षापासून प्रलंबित असलेला चंदगड तालुक्‍यातील 47 गावातील 55 हजार शेतकऱ्यांच्या शेतावरील हेर सरमजांम हा शासकीय शिक्का काढून टाकून त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करुन देण्याचे धाडस श्री देसाई यांनीच केले. याशिवाय, शाहूवाडीतील दलित लोकांना त्यांच्या हक्काची जमिन देण्यातही देसाई यांनी पुढाकार घेतला. शहरातील बी टेन्यूअरचा मार्गी लावून लोकांचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी नियोजन केले आहे.

हेही वाचा: कितीही विस्तार करा, शिवसेनेला पंढरपूरच दाखणार; शेलार यांची टीका

दरम्यान, राहूल रेखावर हे मूळचे खडकी बाजार, (ता. हिम्मतनगर, जिल्हा नांदेड) येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावी पर्यतचे शिक्षण पीपल्स हायस्कूल मध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भाभा अनुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2011 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात 15 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. 2012 भारतीय प्रशासन सेवेत. फेब्रुवारी 2015 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सेवेत सेवेची संधी. त्यांनी सुरुवातीला राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. फेब्रुवारी 2020 पासून ते जिल्हाधिकारी म्हणून बीड येथे कार्यरत होते.

हेही वाचा: 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

loading image