कोल्हापुरात गुंडगिरी, फाळकूटदादांची दहशत; मध्यरात्री पोलिसांनी राबवले 'कोम्बिंग ऑपरेशन', 10 गुंडांच्या अड्ड्यांवर छापे

फाळकूटदादांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी (Kolhapur Police) कंबर कसली आहे.
Combing Operation in Kolhapur-
Combing Operation in Kolhapur-esakal
Updated on
Summary

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यांचा बंदोबस्त होण्यासाठी पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

कोल्हापूर : फाळकूटदादांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी (Kolhapur Police) कंबर कसली आहे. काल रात्री शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, सदर बाजार, कसबा बावडा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुंडांची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न खुद्द अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केला. यात ओपन बार, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हसह अन्य गुन्हे दाखल केले असून काही हद्दपारांच्या घरातही चौकशी करण्यात आली.

शहरात गुंडगिरी, फाळकूटदादा, खासगी सावकारांची दहशत वाढत आहे. छोटे-मोठे गुन्हे वाढत असून खुनापर्यंत वाद पोचत आहेत. यामुळे शहरातील झोपडपट्टी भागातील गल्लीबोळात जाऊन पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत मोडीत काढली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राजेंद्रनगर, शाहूपुरीतील काही भागात अशाच पद्धतीने पोलिस ॲक्शन मोडवर आले होते.

Combing Operation in Kolhapur-
Rajan Salvi : 'मला अटक झाली तरी चालेल, पण पुन्हा ACB च्या चौकशीला जाणार नाही'; आमदार राजन साळवी संतापले

काल मध्यरात्री पुन्हा एकदा पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) केले. रात्री साडेअकरा ते मध्यरात्री तीन दरम्यान हे ऑपरेशन झाले. यामुळे रात्रीची होणारी दहशत कमी होईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक यमगर, उपनिरीक्षक सुनीता शेळके, हर्षल बागल, प्रणाली पोवार, सहायक फौजदार संदीप जाधव, रवी आंबेकर, मिलिंद बांगर, विकास चौगुले यांच्यासह सुमारे पन्नासहून अधिक अधिकारी- कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले.

Combing Operation in Kolhapur-
Kolhapur Crime : Share Market मध्ये गुंतवणूक पडली महागात! आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा गोळी झाडून खून

ओपन बारचे दोन गुन्हे दाखल

मध्यरात्री दोन वाजता केलेल्या तपासणीत ओपन बारचे दोन गुन्हे दाखल केले. ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे दोन गुन्हे दाखल केले. तसेच एकूण आठ संशयित आरोपींची माहिती घेतली. हद्दपार असलेले चार संशयित भागात, घरी कोठे आहेत काय याची खात्री केली. रात्री प्रवास करणारी २८ चारचाकी वाहने आणि ४९ दुचाकी अशा एकूण ७७ वाहनांची तपासणी करण्यात आली. याबरोबरच आठ लॉजची झडती घेण्यात आली. दहा हॉटेलमध्ये काही अवैध चालले आहे काय, याची तपासणी करण्यात आली. अवैध कृत्य करणाऱ्या एकावर कारवाई केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यांचा बंदोबस्त होण्यासाठी पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. शहरातील ज्या झोपडपट्ट्यांत गुन्हेगारी वाढत आहे, अशी ठिकाणे पोलिसांनी लक्ष्य केली आहेत. अनेक वेळा हद्दपार गुंड पुन्हा शहरात येऊन दादागिरी करतात, फाळकूटदादांचा वापर वाढतो. त्यामुळेच पोलिसांनी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी सुरू केली आहे.

Combing Operation in Kolhapur-
Talathi Bharti : 'तो' आरोप सिद्ध न केल्यास रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार; मंत्री विखे-पाटलांचा स्पष्ट इशारा

११२ क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहन

ज्‍या नागरिकांना फाळकूटदादा, गुंड, खासगी सावकार, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यासह इतरांकडून दमदाटी केली जात असेल, विनाकारण त्रास दिला जात असेल त्यांनी त्याची तक्रार ११२ या टोल फ्री पोलिसांच्या क्रमांकावर किंवा पोलिस ठाण्यात संपर्क साधून द्यावी. कोणाचीही भीती न बाळगता पोलिस ठाण्यातसुद्धा त्यांच्या तक्रारी कराव्यात, असेही आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com