
कोल्हापूर : मुली आणि महिला सर्वच क्षेत्रात यशाची पताका फडकवत असल्या तरी मुलींची छेडछाड आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मात्र अजूनही कमी झालेले नाही. घराच्या उंबऱ्याच्या आत आणि उंबऱ्याच्या बाहेरही तिला अनेक संकटांचा सामना आजही करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 7) सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने "चला, दामिनी होवू या' मानवी साखळी होणार आहे. यानिमित्ताने एकमेकांच्या हातात हात गुंफत मुली आणि महिला निर्भय बनण्याचा वज्रनिर्धार करणार आहेत.
मुलींची छेडछाड हा सध्या रोजच्याच बातम्यांचा विषय झाला आहे. त्यातच अमूक एका गावात महिलांवर अत्याचाराच्या बातम्यांची संख्याही अजूनही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर "सकाळ'ने सातत्याने महिला सुरक्षिततेचा जागर मांडला आहे. कॉलेजला जाताना बसमधून प्रवास करताना घ्यावयाच्या काळजीपासून ते कुणी छेडछाडीचा प्रकार केलाच तर संरक्षण कसे करावे? इथपासून ते अगदी एकट्याच असताना पोलिसांची मदत कशी मिळवावी, समुपदेशनातून स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा, अशा विविध अंगांनी प्रबोधनावर भर दिला. महाविद्यालयीन तरूणींशी प्रत्यक्ष संवाद घडवून त्यांच्या नेमक्या अडचणी जाणून घेतल्या. आता प्रत्यक्ष कृतीशील पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. मानवी साखळीतून त्याबाबतचा संकल्प अधिक दृढ केला जाणार आहे.
अशी होईल मानवी साखळी
* ऐतिहासिक बिंदू चौकात सकाळी आठपासून मुली व महिला एकवटतील. साडेआठला त्या एकमेकांच्या हातात हात गुंफतील आणि मानवी साखळी करतील. त्यानंतर पुन्हा साऱ्याजणी निर्भय बनण्याची शपथ घेतील.
* महिला सन्मानार्थ विविध घोषवाक्ये, पोस्टर्स, फलक घेवून विविध महिला संस्था, संघटनाही सहभागी होतील.
* तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण सहभागासाठी संपर्क साधा किंवा माहिती शेअर करा या क्रमांकावर- 9146190191
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.